
आठवणींच जग किती अदभूत असत न!! जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण त्या आठवून त्यात हरवून जातो.
कधी मनापासून हसतो तर कधी नकळत डोळेही भरून येतात. अशा कितीतरी आठवणी आपल्या सोबत असतात नाही... शाळेच्या , college च्या, मित्र - मैत्रिणींच्या , अचानक ठरलेल्या पिकनिकच्या, अगदी रागाच्या भरात मित्रांशी केलेल्या भांडणांच्याही अशा खूप काही आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतात तर काही आपण विसरण्याचा प्रयत्न करत असतो.
कधी पावसात भिजलेल्या आठवणी तर कधी थंडीत गोठलेल्या ..... उन्हात तापलेल्याही आठवणी असतात ज्या खूप चटके देऊन जातात. आठवणी या नाजूक हलक्या पावसांच्या सरीनसारख्या असतात अचानक येऊन भिजवून जातात. कधी भिजावं त्यात मनसोक्त अन नंतर कोरडही व्हावं.
पण उगाच त्यात गुंतून पडण्यात अर्थ नाही आणि योग्यही नाही . कधीतरी विरंगुळा म्हणून ठीक आहे. आपला भूतकाळ तर बदलण शक्य नाही पण म्हणून वर्तमान बिघडवू नये.
पण खरचं त्या कधीच विसरता येत नाही, त्या फक्त पुसट होतात काळाबरोबर....... नवीन आठवणींना पुरेशी जागा देण्यासाठी ....नाही का ?
झक्कास रे ओस्सम,
ReplyDeleteशब्द तर अंतरीचे
दोष मात्र जिभेला लागतो,
मन तर स्वतःच असत
झुराव मात्र दुसर्यासाठी लागत,
ठेस पायाला लागते
वेदना मनाला होतात
आणि रडावं मात्र डोळ्यांना लागत ,
असंच नात जपत जगण
हेच तर खर जीवन असत.....
निक्स वन विश